Tuesday, February 17, 2015

प्रिय बंधू भगिनीनो. 
आजपासून उपवासकाळात प्रवेश करत आहोत.आज राखेचा बुधवार. सुमारे सहाव्या शतकाच्या सुरुवतीपासून ४० दिवसांचा उपवासकाळ  सुरु झाला. ८ व्या शतकाच्या शेवटी पोप साहेबानी रखेची स्थापना केलि. १०९१ साली रेनिश लोकांच्या बेनेवेंतो परिषदेत धर्मगुरु व प्रपंचिक,स्रिया व पुरुष सर्वानि रखेच्या बुधवारी राख लावून प्रायश्चित काळात प्रवेश करावा ऎसे जाहिर केले गेले. १३ व्या शतकपासून रोम च्या कलेंडरमधे रखेच्या बुधवरची नोंद झालि.
पवित्र मिस्सानंतर कपाळाला राख लावून आठवां करूँ दिली जाते की,मानवा तू माती आहेस ,एक प्रकारे पश्चाताप व्यक्त करण्यासाठी हे एक चिन्ह आहे. या काळात पश्चाताप करावा,प्रायश्चित्त घ्यावे,पापापासून  दूर राहवे,प्रार्थना करावी,समेत करावा,उपवास धारावा,मांस वर्ज करावे,नशापान करू नये ,दानधर्म करावा म्हणजे परमेश्वरने वचन दिलेले स्वर्गसुखाची आशा आणि पुनरुथानाचा अनुभव येईल ऎसे कृत्या करावे अशी ख्रिस्टसभेची अपेक्षा आहे. हे मानवाच्या त्तारणासाठी योग्य आहे ऎसे सुचविले जाते. यासाठी बाइबिल मधील योएल २:१२-१८ ,२ कारिंथ ५:२० ते  ६: २ आणि मत्तया आणि मार्क १:१५ ही वाचने मार्गदर्शन करतात. 
अलीकडच्या काळात आपल्याला जीवन जगतना किती अडचणी येत आहेत हे वेगळे सांगायला नकोत. कुटुंबातील वाद,सामाजिक अडचणी,आर्थिक अडचणी,विविध समस्या,राजनितिक अत्याचार,धार्मिक अन्याय,अशा विविध समस्यना सामोरे जाण्यास आपले मनोधैर्य पक्के असणे आवश्यक आहे,त्यासाठी मनन,चिंतन आणि स्वीकरण्याची वृत्ति आवश्यक आहे,ती या उपवास्कलात अपन मिळवण्यासाठी प्रयत्न करुया व खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातील क्रूस घेऊन अपन स्वसंतोषने पुनरुथान संण साजरा करण्यास सिद्धा होऊया.

No comments:

Post a Comment